नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा 352 वा पुण्यतिथी कार्यक्रम उमरठ येथे संपन्न-पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची उपस्थिती

                                                 

नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा 352 वा पुण्यतिथी कार्यक्रम उमरठ येथे संपन्न-पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची उपस्थिती


     *अलिबाग, दि.25 (जिमाका):-* नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, जिल्हा परिषद रायगड, पंचायत समिती पोलादपूर यांच्या वतीने नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा 352 वा पुण्यतिथी कार्यक्रम व शौर्य दिन मान्यवरांच्या उपस्थितीत आज (दि.25 फेब्रुवारी) रोजी महाड तालुक्यातील उमरठ येथे संपन्न झाला.

     कार्यक्रमाच्या सुरूवातीला पर्यटनस्थळे व इतिहासावर आधारित चित्ररथांची मिरवणूक काढण्यात आली व मर्दानी खेळांचे सादरीकरण झाले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी शहीद जवानांवर आधारित नाटिका सादर केली. याप्रसंगी कृषी यांत्रिकीकरण प्रदर्शन, शेतकरी ते थेट ग्राहक थेट शेतमाल विक्री तसेच शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झालेले डॉ.हिम्मतराव बावस्कर यांना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे शौर्य सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

     या कार्यक्रमाला नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज शीतल मालुसरे व रायबा मालुसरे, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, आमदार भरत गोगावले, जिल्हा परिषद सदस्य सुमन कुंभार, नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे, पंचायत समिती सदस्य सभापती नंदा चांदे, नगराध्यक्ष सोनाली गायकवाड, निलेश अहिरे, समृद्ध कोकण संघटना अध्यक्ष संजय यादवराव, नगरसेवक सुरेश पवार, रामदास कळंबे, लक्ष्मण मोरे, स्थानिक प्रशासकीय अधिकारी, शिक्षक वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Popular posts
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image