खोपरखैरणेतील 150 घरे जबरदस्तीने बेदखल
नवी मुंबई- खोपरखैरणेतील 150 घरे जबरदस्तीने बेदखल. डाॕ..आंबेडकर नगर, बालाजी नगर कोपरखैरणे स्टेशनजवळ. गेल्या 20 वर्षांपासून येथे लोक राहतात. त्यापैकी बहुतांश पारधी समाजातील (भटक्या जमाती) आहेत. हजाराहून अधिक पोलीस, अधिकारी, सिडको कर्मचारी, एनएमएमसी कर्मचाऱ्यांनी ही अमानुष कारवाई केली आहे. 16 मे 2018 रोजी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा ठराव मंजूर होऊनही ही कारवाई करण्यात आली आहे. 150 कुटुंबांना कोणतीही सूचना न देता बेदखल करण्यात आले आहे आणि त्यांच्याकडे SRA योजनेनुसार 2000 पूर्वीची आणि 2011 पूर्वीची कागदपत्रे आहेत, त्यांच्या उच्च न्यायालयात खटला सुरू आहे.असे असतानासुद्धा कोणाचीही न ऐकता ही तोडक कार्यवाही हजारो पोलीस, नगर पालिका कर्मचारी, अधिकारी, CIDCO कर्मचारी यांनी ही अमानुषपणे कार्यवाही केली आहे व शासनाचे कायदे आणि न्यायालयाला न जुमानता ही कार्यवाही झाली आहे. याचा तीव्रतेने निषेध विविध संस्था संघटना यांनी केला असून, घर हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष हिरामण पगार, संतोष नरवाडे, कुंडलिक कांबळे, खाजामीया पटेल नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष, रिपब्लिकन सेना ह्या सर्वानी लोकांचे सांत्वन करून निषेध व्यक्त केला.