RAY एज्युकेशन सोसायटीच्या RAY एज्युकेअर लर्निंग सेंटरला पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा

RAY एज्युकेशन सोसायटीच्या RAY एज्युकेअर लर्निंग सेंटरला पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा 



पनवेल : लॉकडाऊन काळामध्ये इतर व्यवसायप्रमाणे शिक्षण क्षेत्रात देखील मंदी आली. आजपर्यंत शाळा नियमितपणे सुरू झालेल्या नाहीत तरी देखील RAY एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आयेशा रणदिवे यांनी हिम्मत करून दोस्ती हेरिटेज प्लॉट नंबर २६ करंजाडे सेक्टर ४ येथे RAY एज्युकेअर लर्निंग सेंटर सूरु केले आहे . पनवेल महापालिका विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे यांनी यावेळी उपस्थित राहून RAY एज्युकेशन सोसायटीच्या आयेशा रणदिवे व त्यांचा टीम ला शुभेच्छा दिल्या.         

           RAY एज्युकेअर लर्निंग सेंटर मध्ये नर्सरीसिनिअर केजीपहिली ते पाचवीपाचवी ते दहावी (स्टेट बोर्ड सीबीएसइ आयसीएसइ सेमी इंग्लिश) अकरावी ते बारावी (विज्ञान आणि वाणिज्य) आदींचे कोचिंग क्लासेस सुरू करण्यात येणार असल्याची माहीती अध्यक्षा आयेशा रणदिवे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रम सोहळ्यास पनवेल महापालिका विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रेउद्योजक इकबाल काझी नगरसेवक मुकीत काझीआपला आधार फाउंडेशनचे अध्यक्ष केवल महाडिक करंजाडे पोलीस पाटील कुणाल लोंढे , RAY एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आयेशा रणदिवे, यांच्यासह पालकवर्ग व हितचिंतक उपस्थित होते.