जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेनुसार तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी कोविड लसीकरण शिबिर कार्यक्रम संपन्न
अलिबाग, दि.6 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या सूचनेनुसार तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकरिता दि.06 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पनवेल महानगरपालिका व तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात कारागृहात नवीन दाखल झालेल्या कैद्यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला. तळोजा मध्यवर्ती कारागृहातील दाखल 2 हजार 818 बंद्यापैकी 2 हजार 816 बंद्यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर यापूर्वीच 2 हजार 180 कैद्यांना कोविड लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने दिली आहे.
यावेळी तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक श्री.यु.टी.पवार,पनवेल तहसिलदार विजय तळेकर तसेच पनवेल महानगरपालिकेचे लसीकरण वैद्यकीय पथक उपस्थित होते.