पनवेलच्या मातीत परमेश्वराने इतक्या कलागुणांची पेरणी केली आहे त्यांची व्यवस्थित नांगरनी करून जगाच्या पटलावर आणून त्यांच्या सामर्थ्याची माहिती जगाला करून देण्याचे काम रंगरचना कलामंचाने करावे-संजय कृष्णाजी पाटील

पनवेलच्या मातीत परमेश्वराने इतक्या कलागुणांची पेरणी केली आहे त्यांची व्यवस्थित नांगरनी करून जगाच्या पटलावर आणून त्यांच्या सामर्थ्याची माहिती जगाला करून देण्याचे काम रंगरचना कलामंचाने करावे-संजय कृष्णाजी पाटील


पनवेल(प्रतिनिधी)-पनवेलच्या मातीत परमेश्वराने इतक्या कलागुणांची पेरणी केली आहे त्यांची व्यवस्थित नांगरनी करून जगाच्या पटलावर आणून त्यांच्या सामर्थ्याची माहिती जगाला करून दिली पाहिजे हे काम रंगरचना कलामांचाने करावे असे प्रतिपादन  पनवेलचे प्रसिद्ध चित्रपट लेखक व गीतकार तसेच  राज्य मराठी विकास संस्था मराठी भाषा  संचालक संजय कृष्णाजी पाटील यांनी पनवेलमध्ये शनिवारी केले ते 'रंगरचना कलामंच 'या संस्थेच्या उदघाटनपर कार्यराक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून  बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते व कास्टिंग डायरेक्टर विश्वास नवरे, के वी कन्या विद्यालयाच्या प्राचार्या श्रीम वैशाली वळवी ,महाड पोलादपूर रहिवाशी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार उपस्थित होते.

पणवेलमधील जुन्या जाणत्या नाट्यवेड्या किशोर जोशी , शंकर वाडेकर,कमलाकर वैश्यमपायन यांच्या भावुक  आठवणी काढत चंद्रशेखर सोमण यांच्या 'सूर्याची पिल्ले' या संस्थेचा उल्लेख करून अनेक आठवणींना उजाळा देत काका देशमुख ,  रतनू पारखी , आणि आजही तरुण असलेल्या आपला नाट्यसहकारी मनोहर लिमये आणि इतर मित्रांसोबत महाराष्ट्रातील अनेक नामवंत एकांकिका स्पर्धात मिळवलेली बक्षिसे किती मोलाची होती हे  बोलताना ते पुढे म्हणाले की आज मी ऑक्सर कमिटीवर ज्युरी म्हणून काम केले . माझ्या जोगवा,काकस्पर्श चित्रपटाला आणि त्यातील गाण्यांना अनेक पुरस्कार मिळाले त्याहीपेक्षा सोलापूरमध्ये आमच्या एकांकिकेला शशिकपूर साहेबांच्या हस्ते मिळालेलं पारितोषिक खूप मोलाचं आहे. माझी घडणावळ पनवेलमध्ये झाली.नोकरी करून एकांकिका करायचो त्यासाठी वर्गणी काढायचो,वडापाव खाऊन एकांकिका केल्याचा आनंद खुप मोठा होता.अनेक कर्तृत्ववान लोकांनी पनवेलची रंगभूमी समृद्ध केली हे सांगतानाच बालनाट्यासाठी कल्पनाताई कोठारी यांनी दिलेल्या योगदानाबद्दलही ते बोलले कल्पनाताईंच्या प्रपोजल नाटकाने इतिहास घडवला . रंगरचनाचे प्रमुख विजय पवार, सचिन पाडळकर यांनी नाटक , सिनेमा, मालिका आणि कलेच्या इतर प्रकारांना प्रेरणा द्यावी असा मानसही व्यक्त केला.
 यावेळी अभिनेता व कास्टिंग डायरेक्टर विश्वास नवरे म्हणाले की रंगरचना कलामंच च्या माध्यमातून आलेल्या पवेलमधील कलाकारांना नवीन मालिकांमध्ये नक्कीच संधी मिळेल पण आपल्याकडे नाटकाची बैठक असायला हवीच,बोलीभाषाही आपली असली तरी प्रमाणभाषेवर आपलं प्रभुत्व असणं आवश्यक आहे.नाटकाची भाषा आणि तंत्र आपल्याला समजायला हवे,  हे गणित ज्याला जमलं त्याला सामर्थ्यशाली कलाकार व्हायला वेळ लागणार नाही. महाड पोलादपूर रहिवाशी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार यांनीही आपलं मनोगत व्यक्त केले. 
कार्यक्रमाला अभिनेता व लेखक निनाद शेट्ये, अभिनेता नितीन नारकर , मकरंद मराठे, दीपक म्हात्रे , रामप्रहरचे संपादक देवदास मटाले  पनवेलमधील अनेक कलाकार उपस्थित होते.
       



Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image