अल्पवयिन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी गजाआड

अल्पवयिन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी गजाआड


पनवेल, दि.16 (वार्ताहर)- एका 7 वर्षीय अल्पवयिन मुलीला लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नेऊन तिच्याची विनयभंग केला म्हणून एका इसमास पनवेल शहर पोलिसांनी कामोठे येथून ताब्यात घेतले आहे.

          करंजाडे येथे राहणाऱ्या एका अल्पवयिन मुलीच्या अंगाशी अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दळवी, म पोलिस उपनिरीक्षक चौधरी, हवालदार वाघमारे, पोना महेश पाटील, राठोड, साळुंखे, मिसाळ आदींच्या पथकाने सदर मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे त्या इसमाचा शोध घेण्यास सुरवात केली. ती राहत असलेला परिसर, तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. साधारण 180 च्या वर सीसीटीव्ही फुटेज तपासल्या नंतर संबंधित वर्णनाची व्यक्ती हि दुचाकीवरून त्यावेळेस करंजाडे परिसरात फिरताना आढळून आली. तसेच त्यानंतर ती व्यक्ती कामोठे परिसरात निघून गेली होती. त्याच्या गाडीवरील नंबरच्या आधारे त्याचा पत्ता शोधून या पथकाने त्याला वाहनासह ताब्यात घेतले आहे. सदर व्यक्ती हि विवाहीत असून त्याला मुलगासुद्धा आहे. त्याने हा गुन्हा कशासाठी केला याचा शोध पनवेल शहर पोलिस करीत आहेत.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image