थोर विचारवंत एन. डी. पाटील एक तपस्वी नेता - लोकनेते रामशेठ ठाकूर

थोर विचारवंत एन. डी. पाटील एक तपस्वी नेता - लोकनेते रामशेठ ठाकूर 



थोर विचारवंत प्रा. एन. डी. पाटील साहेब खरं तर एक अतिशय तपस्वी वृत्तीचा नेता, कुणालाही, कधीही न घाबरणारे, आपल्या मनात आहे ते स्पष्टपणे बोलणारे. गोरगरिब, शेतकरी असो किंवा कुठल्याही वर्गातील व्यक्ती असो त्या प्रत्येकाच्या बद्दल त्यांना कणव होती. आज वयाच्या ९३ व्या वर्षी ते आपल्या सर्वाना सोडून गेले, याचे मनाला अतिशय दुःख होत आहे. माझा आणि त्यांचा परिचय जवळपास ४५ वर्षांचा आहे. माझे सासरे जनार्दन भगत साहेब तसेच लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करीत होतो. एन. डी. पाटील साहेब दि. बा. पाटील साहेबांच्या कापड गल्ली येथील कार्यालयात येत असत. गव्हाण तसेच इतर आपल्या विभागात येत असत. १९६७ च्या दुष्काळापासून आम्ही एन. डी. पाटील साहेबांना जवळून ओळखत आहोत. आणि तेव्हा पासून त्यांचे समाजसेवेचे व्रत ते आजपर्यँत सुरूच होते हे आम्ही पहिले आहे.  कधीही त्यांनी आजरपणाची तमा केली नाही. रयत शिक्षण संस्थेचे ते अनेक वर्ष चेअरमन राहिले आहेत. मला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी मला अतिशय प्रेम दिले. ते माझा आवडता नेता होते. त्यांचा आदर्श घेऊन माझी वाटचाल सुरु आहे. गरीब, दीनदुबळ्यांची कणव असलेले एन. डी. पाटील साहेबांचा सर्व क्षेत्रातील अभ्यास मोठा होता. त्यांनी स्वतःच्या जीवनाला कधीही महत्व दिले नाही. जवळचा, परका असा भेदभाव त्यांच्याकडे कधीच नव्हता. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात त्यांचे व्यक्तिमत्व आणि नेतृत्व उत्तुंग होते. जनार्दन भगत साहेबांच्या स्मरणार्थ पहिला पुरस्कार एन. डी. साहेबांना देता आला त्यांचा सत्कार आम्हाला प्रेरणा देऊन गेला.  त्या बद्दल आम्ही स्वतःला धन्य मानतो. थोर एन. डी. पाटील यांच्या निधनाने सर्व क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून राज्याचेच नव्हे तर देशाचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी थोर विचारवंत एन. डी. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना दिली. 
Popular posts
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image