प्रजासत्ताक दिनी बँक ऑफ महाराष्ट्रचे देश सेवा करणाऱ्यांना अर्थ साहाय्य

 तळोजा कारागृहमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना कर्ज मंजूर


प्रजासत्ताक दिनी बँक ऑफ महाराष्ट्रचे देश सेवा करणाऱ्यांना अर्थ साहाय्य


पनवेल :-- बँक ऑफ महाराष्ट्र ही बँकिंग सेवे सोबतच सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असते. बँकेने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देश सेवा करणाऱ्यां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तळोजा कारागृह मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना कर्ज मंजूर केले व बँक अधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.


या प्रसंगी उपस्थित बँकेच्या महाप्रबंधक व नवी मुंबईच्या झोनल मॅनेजर अपर्णा जोगळेकर म्हणाल्या की, देशाचे रक्षण करणे हे सर्वात मोठे कर्तव्य आहे. अशा ह्या कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यां प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे आमच्यासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. आज आम्ही प्रजासत्ताक दिनी ह्या देश सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना कर्ज मंजुर करून अर्थ साहाय्य केल्याबद्दल स्वतःच गौरवशाली झालो आहोत. ह्या आजच्या कर्ज मंजुरीमुळे आम्ही सुद्धा देश सेवे मध्ये सहभागी झाल्याचे आम्हास समाधान वाटत आहे व समाजामध्ये आम्ही देश सेवे बद्दलचा एक चांगला संदेश पोहचवीत आहोत. त्यांनी याप्रसंगी ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना बँके तर्फे शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी तळोजा कारागृहाचे अधीक्षक यु, टी..पवार, बँकेचे उप अंचल प्रबंधक अमित सुतकर, मुख्य प्रबंधक, मनीषा शर्मा, दिलीपकुमार उपाध्याय, शाखा प्रबंधक, प्रिया सिंग व अधिकारी प्रसेनजीत अंकुश, प्रथमेश मलाईकर,पूजन झा, गोपीचंद पाटेकर व अरविंद मोरे उपस्थित होते.

याप्रसंगी बँकेचे महाप्रबंधक अपर्णा जोगळेकर व तळोजा कारागृहाचे अधीक्षक यु.टी. पवार यांच्या शुभहस्ते गृह ऋण मंजुरी पत्र कारागृहाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

याप्रसंगी कारागृहाचे अधीक्षक यु. टी. पवार म्हणाले की, बँक ऑफ महाराष्ट्रचा आजचा स्तुत्य उपक्रम आहे. बँकेने जी कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दल आम्ही बँकेचे आभार मानतो. बँक समाजा पर्यंत पोहचून समाजा प्रति जी आपुलकी बाळगते ही खरोखर चांगला समाज घडविण्याचे द्योतक आहे. त्यांनी बँकेचे कौतुक करून भरभराटी साठी शुभेच्छा दिल्या.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image