षटकोळी साहित्यप्रेमी समूहाचे राज्यस्तरीय तिसरे काव्य संमेलन आनंदात संपन्न
सचिन पाटील (पोयनाड,अलिबाग)-षटकोळी साहित्यप्रेमी समूहाचे तिसरे आॅफलाईन काव्यसंमेलन श्री क्षेत्र देवगड ता.नेवासा जि.अहमदनगर येथे १ व २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. या संमेलनाचे आयोजन षटकोळी साहित्यप्रेमी समूहाच्या सर्वेसर्वा कवयित्री संध्याराणी कोल्हे व कवी नितीन गायके यांनी केले आहे.
१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी व लेखक श्री विठ्ठल घाठीडी उद्दाटक साहित्यिक कवी डाॅ.कुलदिप पवार प्रमुख पाहुणे मा.दैवशाला पुरी, मा.अॅड.शंकर कदम, मा.डाॅ.प्रा.गुंफा कोकाटे यांच्या उपस्थितीत सोहम पब्लिकेशनतर्फे व षटकोळी साहित्यप्रेमी समूहातर्फे मा.संध्याराणी कोल्हे यांनी संपादन केलेल्या "काव्यप्रेमींची गुंफण" व "काव्यसागर" या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे तसेच मा.संध्याराणी कोल्हे यांच्या "काव्यसार" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मोठ्या उत्साही व आनंदाने वातावरणामध्ये श्री क्षेत्र देवगड ता.नेवासा जि.अहमदनगर येथे प्रकाशन झाले.
षटकोळी साहित्यप्रेमी समूहातर्फे डॉ.कुलदीप पवार यांना जीवनगौरव, श्रीमती संगिता झेंडे यांना जीवनगौरव, डॉ.प्राचार्य गुंफा कोकाटे यांना ज्ञानज्योत, अॅड.कवी शंकर कदम यांना काव्यरत्न, कवी गुलाबराजा फुलमाळी यांना काव्यभूषण, कवी रज्जाक शेख यांना काव्यज्योत या पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.
२ जानेवारी रोजी सकाळी १० ते १ या वेळेमध्ये काव्यप्रेमींचे काव्यवाचन व काव्यगायन हे मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाले. सर्व आयोजन यथायोग्य असल्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. सर्वांनी एकमेकांचे कौतुक केले. अध्यक्षांनी कवितेबद्दल खूप छान मार्गदर्शन केले. तसेच नव साहित्यिकांना लिहीण्यासाठी व वाचनासाठी प्रेरणा द्दावी असे विचार व्यक्त केले. संमेलनाचे सुत्रसंचलन कवयित्री आस व कवी गुलाबराजा फुलमाळी यांनी बहारदारपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांनी खूप छान प्रकारे सहकार्य केले.