अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटार सायकलस्वाराचा मृत्यू

 अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटार सायकलस्वाराचा मृत्यू


पनवेल, दि.20 (वार्ताहर) ः एका अज्ञात वाहनाची धडक मोटार सायकलला बसल्याने त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील मुंबई-पुणे जुना हायवे रोडवर वेलवेट हॉटेलच्या समोर कोळखे गावाच्या परिसरात घडली आहे.

मोटार सायकलस्वार अशोककुमार रामलोटन गुप्ता (51) हे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल क्र.एमएच-43-बीएल-6574 हे मुंबई-पुणे जुना हायवे रोडने जात असताना हॉटेल वेलवेटच्या समोर पुणे बाजूकडे त्यांच्या मोटार सायकलला कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते गंभीररित्या जखमी होवून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image