सिडको हद्दीतील गृहनिर्माण संस्थांना पाच वर्षे मालमत्ता कर माफ करण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल, दि.१३ (वार्ताहर) : सिडको हद्दीतील गृह निर्माण संस्था यांना सुरूवातीचे पाच वर्षे मालमत्ता कर माफ करण्याची शिवसेनेने पनवेलचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे मागणी केली आहे.पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, शिवसेना पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, शिवसेना कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी, शिवसेना कामोठे शहर संघटक बबन काळे, शिवसेना कामोठे उपशहरप्रमुख संतोष गणपत गोळे, उमेश खेडेकर, शिवसेना कामोठे विभागप्रमुख प्र.१३ बबन गोगावले यांनी या संदर्भातील लेखी निवेदन दिले. या निवेदनात शहरप्रमुख राकेश गोवारी यांनी म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील संपूर्ण परिसरातील सिडको हद्दीतील गृह निर्माण संस्था यांना सुरुवातीचे पाच वर्षे मालमत्ता कर माफ करावे व त्यामधील त्रुटींबाबत व ५०० स्क्वे. फूट आतील धारकांना मुंबई महापालिका व नवी मुंबई महापालिका मध्ये जसे ५०० स्क्वे. फूट आतील धारकांना कर माफ केले आहे. तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्वाना कर मुक्त करावे व लवकरात लवकर निर्णय घ्यावे अशी विनंती करून पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना शिवसेना कामोठे शहर प्रमुख राकेश रोहिदास गोवारी यांनी निवेदन दिले.