मनोरुग्ण महिला बेपत्ता
पनवेल, दि.29 (संजय कदम) ः एका आश्रमात असलेली महिला बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यातील वांगणी येथील सिल आश्रम येथे घडल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पत्तु देवीनायकम (45) रंग काळा, टक्कल केलेला आहे. डोक्याच्या उजव्या बाजूला मोठी जखम व त्यावर टाके घातलेले आहेत. उंची 5 फुट असून अंगात सलवार कमीज आहे. सदर स्त्री ही मनोरुग्ण आहे व तिला तामिळ भाषा बोलता येते. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे दूरध्वनी 27452444 किंवा पो.हवा.अमोल कांबळे यांच्याशी संपर्क साधावा.