नवीन पनवेल येथे सोब्रायटी रेहाबिलिटेशन सेंटरचे उद्घाटन सभापती तथा नगरसेवक प्रकाश बिनेदार यांच्या हस्ते करण्यात आले

नवीन पनवेल येथे सोब्रायटी रेहाबिलिटेशन सेंटरचे उद्घाटन सभापती तथा नगरसेवक प्रकाश बिनेदार यांच्या हस्ते करण्यात आले


पनवेल/ शंकर वायदंडे :-

नवीन पनवेल येथे दि.९ जानेवारी रोजी सोब्रायटी रेहाबिलिटेशन सेंटर,अर्णवी इलेक्ट्रिकल सोल्युशन आणि बी एस कन्सल्टिंग या अकाउंटिंग तथा कर सल्लागार फर्म चे उद्घाटन पनवेल महानगरपालिका सभापती तथा नगरसेवक प्रकाश बिनेदार, माथाडी कामगारांचे नेते शिवाजी मुढे, आणि प्रसिद्ध सनदी लेखापाल हसमुख शहा, श्रीमती संगीता वाघमारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

 सोब्रायटी रेहाबिलिटेशन सेंटर हे डीलक्स कॅटेगरीतील सेंटर चौक येथील आई-बाबा फाउंडेशन यांच्यामार्फत चालवण्यात येणार असून ते नवीन पनवेल येथील ला ग्रंडेजा प्लॉट नंबर 8 रोड नंबर 1 सेक्टर 11 या ठिकाणी आहे.   रायगड व मुंबई येथील व्यसनाधीन तसेच गरजू लोकांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी हे सेंटर चालवण्यात येणार आहे. यावेळी श्रीमती शीतल भोसले यांनी पुढे बोलताना  सांगितले की समाजामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण हे खूप असून त्यामुळे कौटुंबिक, सामाजिक नुकसान तर होतच आहे त्याचबरोबर  राष्ट्रीय मनुष्यबळाची देखील मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.

 त्यामुळे या सेंटरच्या माध्यमातून समाजातील व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी तसेच ज्यांना उपचाराची गरज आहे अशा व्यसनाधिन लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधन तसेच वैद्यकीय उपचार याच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

  सामाजिक जाणिवेच्या भावनेतून या सेंटरमध्ये  काम केले जाणार आहे अशी  भावना याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली. याकरिता

 आर्थिक दृष्ट्या गरीब परिस्थिती मधून आलेल्या पेशंटना मदत म्हणून आई-बाबा फाऊंडेशनच्या चौक येथील सेंटर मध्ये वर्षाला दोन पेशंटना मोफत उपचार दिले जाणार असून त्याचा सर्व खर्च सोबरायटी रेहाबिलिटेशन सेंटर मार्फत स्पॉन्सर केला जाणार आहे.

 याप्रसंगी उद्घाटन झालेल्या अर्णवी इलेक्ट्रिकल सोलुशन अंतर्गत विविध प्रकारचे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट संदर्भातील प्रोजेक्ट्स हाती घेतले जाणार असून महिला सबलीकरणासाठी व महिला मार्फत चालविण्यात येणारे लघु उद्योग यांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करण्यात येणार आहे.

बी एस कन्सल्टींग च्या माध्यमातून टॅक्स विषयी सल्ला तसेच त्याबाबतीतील अनुपालन विषयी कामे केली जाणार आहेत. याप्रसंगी बी एस कन्सल्टिंग च्या संचालीका श्रीमती शीतल भोसले यांनी असे जाहीर केले की 50 लाखापर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या लघुउद्योजकांना बीएस कन्सल्टींग मध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे. बीएस कन्सल्टींग मध्ये रजिस्टर केलेल्या लघू उद्योजका पैकी दरवर्षी सुरुवातीच्या  20% उद्योजकांना संपूर्णतः फी माफ केली जाणार आहे. त्याच प्रमाणे सर्व  थरातील महिला उद्योजकांना विशेष सवलत म्हणून दर वर्षी सरसकट फी मध्ये 25% फी सवलत दिली जाणार आहे.  याप्रसंगी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.

श्री मुढे, माथाडी कामगारांचे नेते यांनी सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून उपचाराची गरज असलेल्या व्यक्तींना या रीहॅब सेंटरची माहिती देण्याबद्दल काम करण्यात येईल असे सांगितले. त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रकाशजी बिनेदार यांनी देखील या उपक्रमाची प्रशंसा करताना समाजामध्ये अशा प्रकारच्या सेंटरची नितांत गरज असल्याचे सांगितले व येत्या काळामध्ये या सेंटरने सामाजिक जाणिवेतून केलेल्या कामामुळे सर्व दूरपर्यंत त्याचा नावलौकिक पोहोचेल असा आशावाद  व्यक्त केला व या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. डॉक्टर ऋषभ वर्मा यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की व्यसनाधीनता हा एक आजार असून त्याला कुठलाही वर्ग नसतो. मात्र योग्य उपचाराने यामधून प्रयत्नपुर्वक बाहेर पडता येऊ शकते. श्री प्रसाद ओक यांनी देखील या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी उपस्थितांमध्ये डॉक्टर रिषभ वर्मा मानसोपचार तज्ञ,  राज्य कर अधिकारी सचिन केदारलिंगे, सहाय्यक राज्यकर आयुक्त श्रीनिवास राऊत, बीएमसी अधिकारी संग्राम पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अमोल वाघमारे, राज्यकर उपायुक्त प्रमोद भोसले, आई-बाबा फाऊंडेशनचे संचालक प्रवीण नवरे आणि प्रसाद ओक, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image