नाशिक येथील साहित्त्य संम्मेलनात अलका येवले यांच्या "अलकविश्व" ह्या अष्टाक्षरी काव्यसंग्रहाचे श्री विश्वास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

नाशिक येथील साहित्त्य संम्मेलनात अलका येवले यांच्या "अलकविश्व" ह्या अष्टाक्षरी काव्यसंग्रहाचे  श्री विश्वास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

 


सचिन पाटील(अलिबाग)

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी - एम ई ती नाशिक येथे दिनांक ३ डिसेम्बर २०२१ ते दिनांक ५ डिसेम्बर २०२१ संपन्न झाले. त्या संमेलनात दिनांक ५ डिसेंबर २०२१ रोजी कवयित्री/ लेखिका अलका येवले  यांच्या अलकविश्व  ह्या अष्टाक्षरी काव्यसंग्रहाचे सुप्रसिद्ध लेखक श्री विश्वास पाटील आणि मा .डॉ .ई . वायुनंदन कुलगुरु, यशवंतराव चव्हाण महराष्ट्र मुक्त विद्यापिठ नाशिक दिग्गजांच्या हस्ते प्रकाशन झाले.पुस्तक प्रकाशन प्रसंगी  मा .सौ . शेफाली समिर भुजबळ मॅडम, ज्योती उद्योगचे संचालक श्री. वसंतराव खैरनार, अखिल भारतीय महाराष्ट्र परिषद पुणे अंतर्गत ठाणे विभाग अध्यक्ष श्री बाळासाहेब तोरस्कर, डॉ. प्रकाश बर्वे,असिस्टंट लायब्ररीयन,यशवंतराव चव्हाण महराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, डाँ. संभाजी पाटील, लायब्ररीयन इंजिनीरिंग कॉलेज, भुजवळ नॉलेज सिटी, श्री विजय राहणे, लायब्ररीयन भुजवळ नॉलेज सिटी, कवयित्री गीतांजली वाणी, अध्यक्षा, अखिल भारतीय महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे अंतर्गत मुंबई प्रदेश - उत्तर मुंबई अध्यक्षा, श्री योगेश वाणी, या मान्यवरांच्या हस्ते झाले. अलकविश्व काव्य संग्रहाची

     प्रस्तावना ज्योती उद्योगचे संचालक श्री वसंत खैरनार यांनी लिहिली आहे. चारोळी लिखाण ह्या लोकप्रिय छंदातून अष्टाक्षरी कवितांची निर्मिती झाली त्यातील अध्यात्म, मित्रता, स्नेह, प्रेम -. शृंगार, सण-उत्सव, यश -अपयश अशा  विविध  विषयाच्या आशयपूर्ण कविता कवयित्रीचे सामाजिक बांधिलकी - ऋण व्यक्त करणारा हा पहिला काव्यसंग्रह आहे आणि कवयित्रींच्या ह्या कवितेतील मुशाफिरीला वाचकांची दाद मिळेल अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.  अलकविश्व काव्यसंग्रह हा आशययुक्त असून असे अनेक काव्यप्रकारातील काव्यसंग्रह प्रकाशित व्हावे  असे कौतुकास्पद शुभेच्छा संदेशात कवयित्री गीतांजली वाणी आणि श्री विजय राहणे यांनी लिहिले आहे. काव्यसंग्रहाचे  आकर्षक मुखपृष्ठ श्री शेखर सोनावणे यांनी बनविले आहे.