उलवे येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न,"विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची उपस्थिती"

उलवे येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न,"विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची उपस्थिती"



पनवेल : 19 डिसेंबर 2021 रोजी उलवे येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. सिद्धिविनायक मंदिर उलवे येथे श्री गणेशाचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विरोधी पक्षनेतेप्रितम जनार्दन म्हात्रे उपस्थित होते. त्यानंतर सर्व स्थानिक रहिवासीयांच्या तर्फे उपस्थित माई ताई भोईर (सरपंच गव्हाण ग्रामपंचायत ), हेमंत पाटील (सदस्य ग्रामपंचायत गव्हाण ), राजेंद्र घरत (उपाध्यक्ष, भातगिरणी तालुका पनवेल ) मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
      त्यानंतर विभागातील आरक्षित असलेल्या गार्डन प्लॉटवर विरोधी पक्षनेते .प्रितम  म्हात्रे यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी बोलताना प्रीतम म्हात्रे यांनी  उपस्थित रहिवासीयांना अशा प्रकारचे पर्यावरणाच्या दृष्टीने घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल आभार मानले तसेच यापुढेही उलवे विभागांमध्ये कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष उलवे नोड आणि त्यांची जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था संपूर्ण भक्कम पणे रहिवासीयांच्या सोबत असेल याची ग्वाही दिली . प्रत्येक नागरिकाने नुसते झाड न लावता लावलेले झाड हे जर दत्तक घेतले आणि त्याचा आपल्या परिवारातील सदस्य प्रमाणे जतन करून त्याची वाढ केली तर त्या मधून जो सुखद अनुभव मिळतो तो कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही असे आवर्जून सांगितले..
             सदर कार्यक्रमाचे नियोजन श्री. सचिन राजे येरुणकर यांनी केल्या बद्दल उपस्थित मान्यवरांकडून त्यांचे सुद्धा कौतुक करण्यात आले या कार्यक्रमासाठी श्री.नामदेव साळवी (अध्यक्ष श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट उलवे सेक्टर 17), श्री. सुरेश फाटक (जेष्ठ समाजसेवक )
श्री प्रवीण झिंगे, श्री. मंगेश सावंत, श्री. निलेश पाटील, श्री. गणेश कदम, श्री अमित जस्वाल
श्री. विनोद थोरात, श्री. नलवाडे, श्री. प्रकाश सुर्वे, श्री. विलास चांदेल, सौ. रचना सचिन येरुणकर
सौ. कीर्ती फटाक, सौ. झिंगे, सौ. कार्तिकी कदम आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image