९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनात सावली प्रकाशनसमूहाच्या कवयित्री चमकल्या

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनात सावली  प्रकाशनसमूहाच्या कवयित्री चमकल्या


सचिन पाटील(अलिबाग)


श्रीगाव:९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे दि.३ते ५ डिसेंबर मध्ये मोठ्या जल्लोषात पार पडले यामध्ये कविकट्टा मध्ये सुमारे ५०० पेक्षा जास्त कविंनी बहारदार काव्यसादरीकरण केले.  विशेष म्हणजे या सम्मेलनात सावली प्रकाशन समूह (अलिबाग) च्या सदस्या कवयित्री सुनिता कपाळे, कल्पना अंबुलकर, रंजना बोरा,भाग्यश्री बागड, संध्याराणी कोल्हे,संगिता माने,सरोज गाजरे व किशोरी पाटील यांंनीआपल्या बहारदार कविता सादरीकरण करून काव्यरसिकांची मने जिंकली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी संपूर्ण भारतातुन २००० च्या वर कविता येतात त्यामधून निवडक कविंना काव्यसादरीकरणाची संधी मिळते सावली प्रकाशन समूहाच्या कवयित्री गीतांजली वाणी यांच्या काव्यांगी व कवयित्री अलका येवले यांच्या अलकविश्व या काव्यसंग्रहांचे मराठी सम्मेलनात प्रकाशन करण्यात आले या कवयित्रींची निवड झाल्याने त्यांंचे समूह संस्थापक सचिन पाटील यांच्यायासह सर्वांकडुन अभिनंदन करण्यात येत आहे