पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरिक्षक पदी विजय कादबाने-पत्रकार राज भंडारी, रविंद्र गायकवाड यांनी दिल्या शुभेच्छा

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरिक्षक  पदी विजय कादबाने-पत्रकार राज भंडारी, रविंद्र गायकवाड यांनी दिल्या शुभेच्छा



पनवेल : राज भंडारी

पनवेल शहर पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारलेल्या पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना शुभेच्छा देण्यासाठी पनवेलमधील राजकीय पदाधिकाऱ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मंडळी आणि पत्रकारांची मांदियाळी सुरू झाली. एक खाकी वर्दितला देव माणूस म्हणून त्यांना जवळून पाहण्याचा आमचा योग. आज त्यांना शुभेच्छा देण्याचे भाग्य दैनिक पुढारी, दैनिक कृषीवल आणि दैनिक वादळवाराचे प्रतिनिधी म्हणून राज भंडारी, पत्रकार रविंद्र गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांना मिळाले.

पनवेल शहर पोलिस ठाण्यामध्ये एक उपनिरीक्षक पदावर काम करून नंतर पुन्हा पनवेलमध्ये वेगवेगळ्या पदावर रुजू झालेले विजय कादबने सर यांचा प्रवास खडतर झाला. मात्र कितीही खडतर प्रवास असला तरी आपण जनतेचे सेवक असल्याची त्यांची भावना त्यांनी कधीही पोलिसी खाक्यात दाखविली नाही. गुन्हेगारांना मात्र त्यांनी माफ केलं नाही पण आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांवर त्यांनी अधिकारी पदाची दहशत ठेवलीच नाही. त्यामुळे आज पनवेल शहर पोलिस ठाण्यात जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहर पोलिस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमधून विजय कादबाने यांच्या पदभार स्विकरण्यावर समस्त पनवेलकर, राजकीय पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील नामवंत, पत्रकार आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच हसू उमलताना दिसत आहे.

२०२१ वर्ष हे येथील जिवाभावाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांचे बढतीचे वर्ष ठरले. मात्र याठिकाणी तळोजा येथून अजयकुमार लांडगे यांची बदली पनवेल शहर पोलिस ठाण्यात झाली. अमाप माया जमविली मात्र येथील स्थानिक भूमिपुत्र, समाजसेवक, पत्रकार, राजकीय पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण करणारे गब्बर अधिकारी ठरले. जरी अजयकुमार लांडगे हे काही पत्रकारांशी मैत्रीने वागत असले तरीही त्यांच्या उर्मटपणाला तोड नव्हती. एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख नक्कीच होती, मात्र ते कोणत्याही प्रकारे धुतल्या तांदळाचे नव्हते. कारण त्यांनी हे शब्द त्यांच्या तोंडून वर्तविले आहेत. 

दिनांक १ डिसेंबर रोजी मा.श्री.विजय कादबाने यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला आणि पनवेल सहर पोलीस ठाण्यासह संपूर्ण पनवेलकरांनी पोलिसांच्या मनमानी कारभारातून सुटकेचा निःश्वास टाकला. गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि मित्रांचा मैत्रिपलिकडचा राजा माणूस आज पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी रुजू झाला.