ओबीसी जागर अभियानांतर्गत पनवेलमध्ये तीन दिवस जनजागरण यात्रा

ओबीसी जागर अभियानांतर्गत पनवेलमध्ये तीन दिवस जनजागरण यात्रा 


पनवेल(प्रतिनिधी) ओबीसी जागर अभियानांतर्गत भाजपा उत्तर रायगड ओबीसी मोर्चातर्फे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात जनजागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पनवेलमध्ये तीन दिवस जनजागरण यात्रा आयोजित करण्यात आली आहे. 
           रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०. ३० वाजता या यात्रेला पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सुरुवात होणार आहे. पुढे मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे शिव कॉम्प्लेक्स, त्यानंतर नवीन पनवेल जवळ रेल्वे स्थानकाजवळील बिकानेर कॉर्नर, सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०. ३० वाजता सुकापूर ग्रामपंचायत, त्यानंतर नेरेनाका, लोणिवली, बेलवली, शेडुंग नाका, तर मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता चिंध्रण त्यानंतर महालूंगी, मोर्बे, खानाव, वाकडी, शांतीवन फाटा आणि शेवटी आकुर्ली स्टॉप येथे रथयात्रा होऊन ओबीसी संदर्भात जागर करण्यात येणार आहे. या यात्रेत कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज भुजबळ, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, ओबीसी मोर्चा महिला जिल्हा संयोजक सीता पाटील, पनवेल शहर अध्यक्ष रामनाथ पाटील, तालुका अध्यक्ष विनेश भागीत, शहर महिला संयोजिका वृषाली वाघमारे यांनी केले आहे.