जनजागरण रथयात्रेस उदंड प्रतिसाद
पनवेल(प्रतिनिधी) ओबीसी जागर अभियान अंतर्गत भाजप उत्तर रायगड व पनवेल शहर ओबीसी मोर्चातर्फे जनजागरण रथयात्रेचे आयोजन रविवारी पनवेलमध्ये करण्यात आले होते. भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या हस्ते या रथयात्रेस शुभारंभ झाला. या जनजागरण रथयात्रेस नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.