खारघरमध्ये लवकरचआगरी-कोळी,कराडी भवन-शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांच्या प्रयत्नाला यश
पनवेल(प्रतिनिधी) : पनवेल परिसरात नवी मुंबईच्या धर्तीवर आगरी-कोळी, कराडी भवन उभारण्याच्या मागणीला नगरविकास मंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दिला असून, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.शिरीष घरत यांनी गेल्या काही दिवसांपासून सरकारकडे ही मागणी लावून धरली होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना केल्या आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी यासंदर्भात १३ ऑक्टोबरला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करीत आगरी-कोळी,कराडी संस्कृतीचे प्रतीक असलेले आगारी-कोळी, कराडी भवन पनवेल महानगरपालिका क्षेत्रात खारघरमध्ये उभारण्याची मागणी केली होती. नवी मुंबई ही आगरी-कोळी,कराडी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून उभी राहिली आहे. हजारो हेक्टर जागा सिडकोने संपादित करून या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे स्थानिक आगरी-कोळी,कराडी संस्कृतीचे भव्य-दिव्य असे भवन उभारणे गरजेचे आहे.त्या कामाला आता गती येईल असे शिरीष घरत यांनी "जनसभा" च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.