महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय इतर मागासवर्ग कल्याण समिती यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम
अलिबाग,जि.रायगड दि.09 (जिमाका):- महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय इतर मागासवर्ग कल्याण समितीचे पदाधिकारी विधानसभा सदस्य इतर मागासवर्ग कल्याण समिती प्रमुख श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला मतदारसंघ), विधानसभा सदस्य तथा समिती प्रमुख, विधानसभा सदस्य- श्री.दिपक केसरकर (सावंतवाडी मतदारसंघ), श्री.राजू कारेमोरे (तुमसर मतदारसंघ), श्री.राजेश नरसिंगराव पाटील (चंदगड मतदारसंघ), श्री.विकास ठाकरे (नागपूर (प.) मतदारसंघ), श्री.राजेश एकडे (मलकापूर मतदारसंघ), श्री.गणपत गायकवाड (कल्याण (पू.) मतदारसंघ), डॉ.पंकज भोयर (वर्धा मतदारसंघ), श्रीमती सीमा हिरे (नाशिक (प.) मतदारसंघ), श्री.तानाजी मुटकुळे (हिंगोली मतदारसंघ), श्रीमती मंजुळा गावित (साक्री मतदारसंघ), विधान परिषद सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी (महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा), विधान परिषद सदस्य श्री.अभिजित वंजारी (नागपूर विभाग पदवीधर), विधान परिषद सदस्य श्री.रमेश कराड (महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा), विधान परिषद सदस्य श्री.कपिल पाटील (मुंबई विभाग शिक्षक).
*विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी-* उप सचिव श्री. ऋतुराज कुडतरकर, अवर सचिव (समिती) घ.ज्ञा.देबडवार, प्रतिवेदक 2 अधिकारी, दत्तात्रेय ब्यागलवार (सहाय्यक कक्ष अधिकारी), संजय हडकर (लिपिक टंकलेखक), राजेंद्र भानजी (स्वीय सहाय्यक), कार्यालयातील इतर कर्मचारी (3 व्यक्ती) यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
बुधवार, दि.10 नोव्हेंबर, 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह,अलिबाग जि. रायगड येथे आगमन.स्थळ: शासकीय विश्रामगृह, अलिबाग जि. रायगड, दुपारी 12.30 वाजता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती,इतर मागासवर्गीयांच्या संघटना यांच्यासमवेत अनौपचारिक चर्चा. दुपारी 01.00 ते 02.00 वाजता राखीव. दुपारी 02.00 ते 02.15 वाजता शासकीय विश्रामगृह अलिबाग येथून जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन. दुपारी 02.15 ते 04.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिका पनवेल व नगरपरिषदा (खोपोली,अलिबाग,महाड,पेण,रोहा,उरण,मुरुड जंजिरा,श्रीवर्धन,माथेरान व कर्जत) तसेच नगरपंचायत (तळा,पोलादपूर,माणगाव,खालापूर) जि.रायगड येथील प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, बढती, आरक्षण, अनुशेषाबाबत व इतर कल्याणकारी योजना याबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा, स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग. दुपारी 04.00 वाजता जिल्हा परिषद कार्यालय, अलिबाग,जि.रायगड येथे भेट व तेथील इतर मागास प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, बढती, आरक्षण, अनुशेषाबाबत व इतर कल्याणकारी योजना याबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा, स्थळ:जिल्हा परिषद कार्यालय, अलिबाग जि.रायगड, रात्रौ शासकीय विश्रामगृह,अलिबाग जि. रायगड येथे मुक्काम.
गुरुवार दि.11 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 09.30 ते 10.30 वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील इतर मागास प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, बढती, आरक्षण, अनुशेषाबाबत व इतर कल्याणकारी योजना याबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा, स्थळ:जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग जि.रायगड. सकाळी 10.30 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग, येथून नगरपंचायत पोलादपूर, जि. रायगडकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता नगरपंचायत पोलादपूर, जि.रायगड येथे आगमन. दुपारी 12.30 ते 01.30 वाजता नगरपंचायत पोलादपूर या कार्यालयास भेट व कार्यालयातील इतर मागास प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, बढती, आरक्षण, अनुशेषाबाबत व इतर कल्याणकारी योजना याबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा, स्थळ:नगरपंचायत पोलादपूर जि.रायगड. दुपारी 01.30 ते 02.30 राखीव. दुपारी 02.30 ते 04.00 वाजता कार्यालयातील इतर मागास प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, बढती, आरक्षण, अनुशेषाबाबत व इतर कल्याणकारी योजना याबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा. दुपारी 04.00 वाजता नगरपंचायत पोलादपूर येथून शासकीय विश्रामगृह अलिबाग, जि. रायगडकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह, अलिबाग जि. रायगड येथे मुक्काम.
शुक्रवार, दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 ते 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर मागास प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, बढती, आरक्षण, अनुशेषाबाबत व इतर कल्याणकारी योजना याबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा. सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 वाजता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी,पेण व वाशी मंडळ या कार्यालयातील इतर मागास प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, बढती, आरक्षण, अनुशेषाबाबत व इतर कल्याणकारी योजना याबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा. जि.रायगड.,दुपारी 12.00 ते 02.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड येथे आढावा बैठक (समितीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी दिलेल्या भेटी व विविध कार्यालयात झालेल्या बैठकींच्या वेळी उपस्थित झालेल्या मुद्यांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक व चर्चा, स्थळ:जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग.), दौरा समाप्त.