स्वच्छता दुतांचा विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत प्रभाग क्र १८ मधील स्वच्छता दुतांचा सत्कार विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी स्वच्छता दुतांचे सन्मान करत कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल आभार व्यक्त केले.