डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील "महामानव" या महाकाव्यग्रंथाचे अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील "महामानव" या महाकाव्यग्रंथाचे अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न


*महाराष्ट्रातील तब्बल 2021 कवींनी रचलेल्या 2021 कवितांचा समावेश*


अलिबाग, दि. 20(जिमाका):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील "महामानव" या महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन आज अपर जिल्‍हाधिकारी श्री.अमोल यादव यांच्या दालनात संपन्न झाले. 

   यानिमित्ताने अपर जिल्‍हाधिकारी श्री.अमोल यादव यांनी या महाकाव्य ग्रंथासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

    यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप, *प्रा.श्रध्दा शेटे*, कवी मारुती सपकाळ, ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील, जेष्ठ पत्रकार सुभाष म्हात्रे, महेंद्रकुमार गायकवाड, कवी मधुकर जाधव, उद्योजक कुणाल भोईर, सुजित नांदगावकर हे उपस्थित होते.

     सुप्रसिद्ध लेखक श्री.प्रवीण दवणे यांचे बंधू नांदेड चे रहिवासी प्रा.अशोककुमार दवणे यांनी हे महाकाव्य रचण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. या महाकाव्य ग्रंथात 2021 या वर्षाचे निमित्त साधून एकूण 2021महाराष्ट्र मधील कवींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रचलेल्या 2021 कवितांचा समावेश आहे.

     या महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन आज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले.