पनवेल तालुक्यातील शिवजीनगर येथे श्री जरी मरि माता मंदिराचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि श्री पिरयोगी गणेशनाथजी यांच्या हस्ते संपन्न

पनवेल तालुक्यातील शिवजीनगर येथे श्री जरी मरि माता मंदिराचा  प्राण प्रतिष्ठापना सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि श्री पिरयोगी गणेशनाथजी यांच्या हस्ते संपन्न


पनवेल (प्रतिनिधी)- पनवेल तालुक्यातील शिवजीनगर येथे श्री जरी मरि माता मंदिराचा श्री गणेश व श्री जरीमरी माता मुर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा ७ आणि ८ ऑक्टोबरला साजरा झाला. त्याअंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि श्री पिरयोगी गणेशनाथजी यांच्या हस्ते श्री गणेश व श्री जरी मरि मातेच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

       पनवेल तालुक्यातील शिवजीनगर येथे श्री जरी मरि माता मंदिराचा श्री गणेश व श्री जरीमरी माता मुर्ती प्राण प्रणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये गुरुवारी श्री गणेश पुण्याहवाचन पिठीकापुजन, स्थापित देवतांचे होम, देवमुर्तीची मिरवणुक, दिप पुजन, कलशपूजन, प्रतिष्ठा होम, घंटा, पुजन, ध्वज पुजन करण्यात आले तसेच शुक्रवारी प्रतिष्ठा अभिषेक व महाआरती संपन्न झाली. या सोहळ्याला भाजपचे शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रापंचायत उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ कडू,  गजानन ठाकूर,किशोर ठाकूर, अमित कडू, जितेंद्र कडू, जरी मरी मित्र मंडळाचे अध्यक्ष विनोद कडू, वैभव ठाकूर, सुजीत ठाकूर, नंदा ठाकूर, विक्रम ठाकूर, मनिषा ठाकूर, विजय ठाकूर, कुसूम ठाकूर, विनंती ठाकूर, सुदीप ठाकूर, शशीकांत ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, गुंजाबाई ठाकूर, व्ही.के.ठाकूर, कुसूम ठाकूर, रतन ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, आशा म्हात्रे, गजानन ठाकूर, किशोर ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.