युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावली निमित्त ' भव्य किल्ले स्पर्धा २०२१' चे आयोजन
दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा मोर्चाच्यावतीने भव्य किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ०७ हजार रुपये तर द्वितीय व तृतीय अनुक्रमे ०५ हजार व ०३ हजार रुपये असून एकूण ३० हजार रुपयांची २० उत्तेजनार्थ पारितोषिके असणार आहेत. एकूण विजेत्यांना ४५ हजार रुपयांची पारितोषिके व आकर्षक चषक ने सन्मानित करण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता नावनोंदणीची अंतिम तारीख ०२ नोव्हेंबर आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी रोहित जगताप (८६९१९३०७०९), अजिंक्य भिडे (८८५०६४४२०७), देवांशू प्रभाळे (८४३३५१३५४०), किंवा अनिकेत भोईर (९९३०१०४४९९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.