सभापती सुशिला घरत यांच्या स्वखर्चातून पाईप लाईनचे काम
पनवेल (प्रतिनिधी) असोसिएशन मधील रहिवाश्यांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या प्रभाग 'ड' सभापती सुशिला जगदिश घरत यांनी स्वखर्चाने पीव्हीसी पाईप लाईनचे काम करून दिले.
नवीन पनवेल मधील ई १ ते ५ मधील पाणी पुरवठा पाइपलाईनचे काम भाजपच्या नगरसेविका व प्रभाग समिती सभापती सुशिला घरत यांनी स्वखर्चाने करून दिले. त्यामुळे नागरिकांना आता सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे ई १ ते ५ मधील रहिवाशांनी सभापती सुशिला घरत यांना धन्यवाद देत आभार मानले.