पालिका कर्मचारी,शिक्षक,आरोग्यसेविका यांना सानुग्रह अनुदान मंजूर- विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश
पनवेल : 2021 च्या दीपावली सणानिमित्त पालिका अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना सानुग्रह अनुदान मिळावे आणि सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर करावी ही मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली होती. पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पालिका कर्मचारी, पालिका शिक्षक, आरोग्य सेविका यांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे.