जिल्हा प्रशासन आणि विधी प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन

 जिल्हा प्रशासन आणि विधी प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन


*जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीम.विभा इंगळे यांचे आवाहन*

 

अलिबाग,जि.रायगड,दि.30 (जिमाका) : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविल्या जात असलेल्या "पॅन इंडिया जागृती अभियान" अंतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजना व विधी सेवांबाबत माहिती होण्यासाठी  सोमवार, दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी महामेळावा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे यांनी दिली आहे.

          रायगड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि.1 नोव्हेंबर 2021 रोजी रिलायन्स पेट्रोकेमिकल्स टाऊनशीप, बेणसेवाडी, ता.पेण येथे सकाळी 11.00 वा. विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा आणि योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

       या मेळाव्याचे उद्घाटन उच्च न्यायालय मुंबई तथा कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईचे वरिष्ठ न्यायमूर्ती ए.ए.सय्यद व न्यायमूर्ती जी.एस.कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.तर या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव दिनेश प.सुराना, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्रीमती विभा प्र.इंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

     या महामेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी तसेच कायदेविषयक जनजागृती व्हावी, याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड अलिबाग, जिल्हा परिषद रायगड, वनविभाग रायगड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड, जिल्हा भूमी अधीक्षक, रायगड, जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, पेण, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, रायगड अलिबाग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड- अलिबाग, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा अग्रणी बँक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण, सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय रायगड-अलिबाग, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी, रायगड, उप आयुक्त, पशुसंवर्धन, रायगड, सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अलिबाग, उपायुक्त, कामगार कार्यालय, पनवेल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, नगरपालिका प्रशासन अशा प्रकारे विविध शासकीय विभागांचे 55 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.

      या कार्यक्रमाचे निमंत्रक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग चे सचिव न्यायाधीश संदिप वि.स्वामी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील हे आहेत.

    तरी या महामेळाव्याचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे यांनी केले आहे.