शब्दशिल्प कलाविष्कार संघ साहित्यिक समूहातर्फे महिला सारस्वतांचा शब्दशिल्प दुर्गा सन्मान

शब्दशिल्प कलाविष्कार संघ साहित्यिक समूहातर्फे महिला सारस्वतांचा शब्दशिल्प दुर्गा सन्मान

( पोयनाड,अलिबाग)  सचिन पाटील

         नवरात्र म्हणजे खऱ्या अर्थाने स्री शक्तीची जाणिव विविध रूपात, विविध कार्यात करून देणारे पर्व. ह्या सणाचे औचित्य साधुन शब्दशिल्प कलाविष्कार संघ साहित्यिक समूहातर्फे कार्यकारिणीने समूहातील महिला सारस्वतांचा शब्दशिल्प दुर्गा सन्मान ह्या नावाचे ऑनलाईन सन्मानपत्र समूहातील पुरूष सारस्वतांच्या हस्ते वितरण करून आगळा वेगळा सन्मान सोहळा आयोजित केला होता. ते आकर्षक सन्मानपत्र उत्कृष्ठ  ग्राफीक्सकार श्री. विकास पालवे यांनी साकारले होते. कार्यकारिणीच्या मते प्रत्येक स्रीमधे दुर्गा असते आणि ती प्रसंगानुरूप आकार घेते. स्रीच्या ह्या अफाट शक्तीची जाणिव तिला स्वतःला  ह्या धकाधकीच्या आधुनिक युगात करण्याणा हा एक निरागस प्रयत्न होता. विशेष म्हणजे समूहातील पुरूष सारस्वतांच्या हस्ते सन्मान केल्याने स्रीसाठी आदरयुक्त भावना अधिक जागृत झाली असे वक्तव्य सन्मानकर्ते साहित्यिक पुरूषांनी केले.

हा सन्मान साहित्यिक प्राचार्य श्री.पंढरीनाथ शेळके, प्राध्यापक श्री. द. ल. वारे सर,.इंजि. गोवर्धन बिसेन, सावली प्रकाशन समूह सर्वेसर्वा श्री. सचिन पाटील तसेच तरूण कवी मयूर पालकर यांच्याहस्ते केला गेला. शब्दशिल्प अध्यक्षा सौ. अलकाताई येवले व कार्याध्यक्षा सौ. गीतांजली वाणी ह्यांच्या नवनवीन संकल्पनांनी विविध उपक्रम तसेच स्पर्धा राबवून साहित्यिक सेवे बरोबरच समाज प्रबोधन देखील होते. ह्या कार्यात त्यांना श्री. राहुल मुंढे, कवयित्री, लेखिका सौ. चंदन तरवडे, कवयित्री,लेखिका सौ. योगिता तकतराव, कवयित्री, लेखिका सौ. आम्रपाली घाडगे, कवयित्री ,लेखिका सौ, भाग्यश्री बागड, कवयित्री ,लेखिका सौ. आम्रपाली धेंडे तसेच कवी ज्ञानेवर शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. घटस्थापनेच्या दिवसापासुन दसऱ्यापर्यंत सहज सोप्या वैविध्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करून साहित्यिक लिखाणास प्रोत्साहन देण्याचे निरपेक्ष कार्य अविरत चालु आहे.