नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेवून प्रभागातील समस्यांचे दर्शन घडविले

नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेवून प्रभागातील समस्यांचे दर्शन घडविले 



खारघर (प्रतिनिधी)दि.३०

      खारघर प्रभाग क्रं ४ च्या कार्यतत्पर नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता तात्याजी अहिरे, सहाय्यक कार्यकारी अभियंता अमित शेटे व सहाय्यक अभियंता दर्शन कोळी यांना बरोबर घेऊन काल शनिवार दिनांक ३० आॕक्टोंबर  रोजी प्रभागातील सेक्टर १९ मधील गटारांवरील झाकणे, रस्ते , रस्त्याच्या मधील सिव्हरेज लाईनचे झाकण, फुटपाथवरील अतिक्रमण ,सिडकोच्या मालकी हक्काच्या काही भूखंडांवरती झालेली घाण व अतिक्रमण याचे प्रत्यक्ष दर्शन घडविले. आपल्या प्रभागातील   नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्त्यक्ष सिडको अधिकाऱ्यांना बरोबर घेत पाहणी करण्यात आली.

       सदर पाहणी दौऱ्यात सिडकोचे कार्यकारी अभियंता यांनी आपल्या बरोबर असलेल्या  अधिकाऱ्यांना सूचना देत सदर प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत अश्या सूचना दिल्या. मोकळे भूखंड लवकरच स्वच्छ करून देण्यात येतील असे देखील त्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना आश्वासित केले.याप्रसंगी पनवेल महानगरपालिका नगरसेवक आणि माजी सभापती मा.अभिमन्यूशेठ पाटील, समाजसेवक किरण पाटील हे देखील उपस्थित होते. नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की त्यांनी आठवड्यातून  एक दिवस देत प्रत्येक सेक्टर निहाय दौरा करून त्या सेक्टर मधील प्रश्न समजून त्यातून मार्ग काढावा.त्यानुसार सिडकोच्या अधिकाऱ्यांनी लवकरच सेक्टर २० व उर्वरित सेक्टरमध्ये देखील अश्याच प्रकारे प्रत्यक्ष पाहणी करून सिडकोच्या अखत्यारीत येणारी कामे करून देऊ असे नगरसेविका नेत्रा किरण पाटील आणि अभिमन्यूशेठ पाटील यांना सांगीतले.