मानवता सेवा प्रतिष्ठाण व अपंग क्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठ्यात वृक्षारोपणाचे आयोजन- लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

मानवता सेवा प्रतिष्ठाण व अपंग क्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठ्यात वृक्षारोपणाचे आयोजन- लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन



कामोठा (प्रतिनिधी)-  मानवता सेवा प्रतिष्ठाण व अपंग क्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे कामोठे येथे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून, त्यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लीश स्कूलच्या आवारामध्ये वृक्षारोपन करण्यात आले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मानवता सेवा प्रतिष्ठाण व अपंग क्रांती संघटनेच्या माध्यमातून चांगले काम सुरु असून, तुमची जीद्द अशीच कायम ठेवा असे प्रतिपादन केले.

या कर्यक्रमाला न्यू इंग्लीश स्कूलचे व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील, मानवता सेवा प्रतिष्ठाण व अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील, कार्यकारी अध्यक्ष किशोर पाटील, निवृत्त प्राध्यापक राजाराम पाटील, पनवेल मंडल अधिकारी संतोष पाटील, जिल्हा महिला सदस्या श्रद्धा पाटील, लीना चिंबूळकर, रायगड जिल्हाध्यक्ष विलास फडके, उपाध्यक्ष बाळराम रोडपालकर, सचिव राजाराम गोरे, विनोद देवकर, दत्तात्रय पाटील, अतुल रायबोले, रोशन एंजल, अनिल गोवारी, कुलदीप तांबे, उज्वला नलावडे, विलास ठाकूर, रविंद्र राठोड, महिला संघटक अनिता मसुंदे, सल्लागार सुरेश वाशीकर, संदेश दलाल, उषा अहिरे, कवी पाटील, खगेश्वर मोहंती यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.