अॕड. मनोज धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तादान शिबीर संपन्न
अलिबाग-पोयनाड(सचिन पाटील)
श्रीगाव:अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील रा.जी.प.चे माजी अध्यक्ष प्रकाश धुमाळ यांचे पुत्र व पेझारी ग्रामपंचायत उपसरपंच अॕड. मनोज धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान ठेवून व आपली समाजाप्रती असणारी जबाबदारी लक्षात घेऊन दि. २७ ऑक्टोबर रोजी रक्तदान व आरोग्य शिबिराचे श्रीगणेश क्रिडा मंडळ दिवलांग, उडाण सामाजिक संस्था व आई जेनिरिक मेडीकल स्टोअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते सदर शिबीराचे उद्घाटन अलिबागचे माजी आमदार सुभाष पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी रा.जी.प.चे माजी अध्यक्ष प्रकाश धुमाळ, अलिबाग नगरपरिषद नगरसेविका चित्रलेखा पाटील,राजीप. सदसा भावना पाटील, राजीप सदस्य आस्वाद पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर पंचायत सदस्या रचना म्हात्रे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते यामधे रक्तदान शिबीरास शासकीय रक्तपेढी अलिबाग यांचे सहकार्य लाभले ३५ रक्तबाटल्यांचे संकलन झाले त्याबद्दल जिल्हा रक्तपेढी तर्फे त्यांचा गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले आरोग्य शिबीरात ११२ रूग्णांणी शुगर व बीपी तपासणी मोफत करण्यात आली तसेच कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि मेडिकल वर्कर्स यांचा व महाड महापुरात मदत करणाऱ्या मंडळांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार केला एड. मनोज धुमाळ यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने सामाजिक बांधीलकी जपणारा ठरला या शिबीरासाठी श्रीगणेश क्रिडा मंडळाने व इतर सहकारीनी अथक परिश्रम केले