वलप येथे विकास कामांचा धडाका-आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

वलप येथे विकास कामांचा धडाका-आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ


पुढील एक वर्षात पनवेल तालुक्यातील सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये आर ओ चे  पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार
- आमदार बाळाराम पाटील.




पनवेल (प्रतिनिधी)- वलप ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामांचा शुभारंभ रविवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, रा जी प चे माजी अध्यक्ष अनंतराव पाटील,गटविकास अधिकारी संजय भोये,पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर दत्तात्रय पाटील,नगरसेवक गोपाळ भगत,रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके,पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोहन कडू,रायगड एकता श्रमिक संघटना सरचिटणीस तथा दीपक फर्टीलायझर एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस प्रकाश म्हात्रे,माजी पंचायत समिती सभापती वृषाली देशेकर. विस्तार अधिकारी विश्वास म्हात्रे, डिप्युटी इंजिनिअर कुलकर्णी, शाळा समिती सदस्य  भाऊ भोईर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
      शेकाप चे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले.
       आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते प्रारंभ करण्यात आलेल्या विकास कामांच्यात वलप येथे जिल्हा नियोजन समितीच्या सेस फंडातून टेंभे वस्ती कडे जाणारा जोडरस्ता काँक्रिटीकरण करण्यात आले.या कामासाठी दहा लाख रुपयांचा खर्च आला आहे.तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सेस फंडातील दहा लाख रुपयांच्या खर्चातून वलप गावातील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे.येथील आदिवासी वाडी येथे साडेआठ लाख रुपयांच्या खर्चातून अंगणवाडी उभारण्यात येणार आहे,आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते अंगणवाडीचे भूमिपूजन करण्यात आले.
        ग्रामपंचायत वलप च्या स्वनिधीतून  प्राथमिक शाळेमध्ये अडीच लाख रुपयांच्या खर्चातून बोलक्या भिंतींच्या पेंटिंग चे काम पूर्ण करण्यात आले आहे.तसेच एक लाख रुपयांच्या निधीतून वलप गावात अकरा सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.
       विशेष उल्लेखनिय म्हणजे पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून 15 व्या वित्त आयोग अंतर्गत उभारलेल्या आर ओ  
  वॉटर ए टी एम चे या वेळी उदघाटन करण्यात आले.प्लांट साठी 4 तर शेड साठी 2 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये कार्यान्वित होणारा हा पहिलाच प्लांट आहे.याशिवाय वलप येथे 2 लाख 99 हजार रुपयांच्या निधीतून विहीर परिसर सुशोभीकरणाचे काम देखील पूर्णत्वास आले आहे.आदिवासी वाडी स्मशानभूमी व वलप समशानभूमी यांची डागडुजी तसेच सार्वजनिक शौचालयाचे नूतनीकरण ही कामेदेखील पंचायत समितीच्या फंडातून पूर्ण झालेली आहेत.याशिवाय आदिवासी बांधवांसाठी विहीर खोदकामास प्रारंभ करण्यात आला आहे.
        शासकीय योजनांचे लाभ थेट लाभार्थींना मिळवून देण्यात देखील वलप ग्रामपंचायत चार पावले पुढे आहे.संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आदिवासी वाडीतील 17 आदिवासी विधवा महिलांना प्रति महा  1200 रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून दिवाळीच्या पूर्वी त्याचा थेट लाभ खात्यावर जमा झाला आहे.तसेच पंतप्रधान आवास योजनेतून 17 घरांना मंजुरी मिळवण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे.प्रधानमंत्री जलजीवन योजनेतूनगणेश नगर आणि हेदुटणे येथे प्रत्येकी  पावणे दोन कोटी रुपयांच्या निधी मधून पाणीपुरवठाा योजना कार्यान्वित केली जाणार आहे.या प्रकल्पामुळे सुमारे अडीच हजार घरांच्यात पिण्याचे स्वच्छ पाणी दिले जाईल.
एकंदरीतच वलप ग्रामपंचायत हद्दीत विकासकामांचा धडाका पाहायला मिळाला.

चौकट

आर ओ वॉटर पेटीएम या  संकल्पनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला फिल्टर पाणी देणे हे आमचे कर्तव्य आहे.कोरोना महामारी नंतर आपले स्वास्थ्य टिकवून ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला एव्हाना समजले आहे.दुशित पाण्यामुळे रोगराई पसरते हेदेखील आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे.दुर्गम आदिवासी पाड्यांतील नागरिकांना देखील फिल्टर पाणी पिता यावे, यासाठी आम्ही हा प्लांट कार्यान्वित केला आहे.एक रुपयात एक लिटर मिनरल पाणी, तर दहा रुपयात  वीस लिटर मिनरल पाणी या द्वारे लाभार्थ्यांना मिळेल.यासाठी कुठलेही निकष नसून याचा लाभ सर्वजण घेऊ शकतात.
        काशिनाथ पाटील यांच्या सह या कार्यक्रमाचे आयोजनासाठी  काँग्रेसचे रायगड जिल्हा चिटणीस तुषार अनंत पाटील,सरपंच जयमाला पाटील,उपसरपंच मनोज कृष्णा पाटील,भोलेनाथ राजाराम पाटील,प्रियांका राजेश पाटील,नीलम संदीप जोशी,कविता प्रमोद पाटील,रोहित रमेश वाघे,एस बी देवकाथे,


चौकट


वलप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वेळेस महाविकासआघाडी म्हणून आम्ही जी जी आश्‍वासने दिली होती ती पूर्ण करण्यासाठी पुढच्या निवडणुकीची वाट पाहत बसलो नाही.जी विकासकामे नागरिकांना पाच वर्षात अभिप्रेत होती ती आम्ही पाच महिन्यात करून दाखवली.मी काशिनाथ पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो.आर ओ वॉटर एटीएम काळाची गरज असून पुढील एक वर्षात पनवेल तालुक्यातील सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये आर ओ चे  पाणी देण्यासाठी आम्ही  प्रयत्न करणार आहोत.

आमदार बाळाराम पाटील.