गणेशोत्सवाच्या सणानिमित्त पूर्वतयारी व उलवे नोडमधील विविध समस्यांबाबत सिडको बरोबर बैठक संपन्न

गणेशोत्सवाच्या सणानिमित्त पूर्वतयारी व उलवे नोडमधील विविध समस्यांबाबत सिडको बरोबर बैठक संपन्न


पनवेल दि.३ (वार्ताहर)- येत्या गणेशोत्सवाच्या सणानिमित्त पूर्वतयारी व उलवे नोडमधील विविध समस्यांबाबत अधीक्षक अभियंता सिडको उलवे नोड यांच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

       या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते रविशेठ पाटील यांच्या सह रोटरी उलवेचे प्रेसिडेंट शिरीष कडू, सचिन राजे,हरिश्चंद्र भगत, सचिन मोरे, अशोक जाधव,निलेश सोनवणे, शिल्पा सोनवणे, नितीन आढाव, शामराव निंबाळकर, प्रशांत कदम, संदीप पाटील, निलेश पाटील, चिरंजीव सावंत, संकेत आवटे,विनोद थोरात, शंकर साळुंखे तसेच विविध सेक्टरमधील प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वप्रथम रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर टाकणे व डागडुजी तसेच सेक्टर 2,9, 23 येथील विसर्जन स्थळी पुरेशी लाईटची व्यवस्था व निर्माल्य टाकण्याची व्यवस्था यांसोबतच पुरेश्या दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करणे, स्मशानभूमी चालू करणे, धार्मिक प्लॉट, हॉकर्स झोन, कायमस्वरूपी पोलीस चौकी,नालेसफाई,घंटागाडी,औषध फवारणी,सांडपाणी व्यवस्था, स्ट्रीट लाईट इत्यादी विषयांवर देखील चर्चा करून संबंधित अधिकारी यांनी सदरचे विषय लवकरात लवकर सोडवण्याचे मान्य केले आहे. 

         

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image