रजनी गायकवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
पनवेल दि १२ (प्रतिनिधी)
रायगड जिल्हा परिषद अलिबाग शिक्षण विभागातर्फे रायगड जिल्हयातील आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आले आहेत . यामध्ये मोहोपाडयातील शिक्षिका रजनी गायकवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
रजनी गायकवाड या 24 वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करीत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या मोहोपाडा येथील शाळेत 12 वर्षे, पानशिल येथे 10 वर्षे काम केले असून सध्या त्या शिवनगर येथे ज्ञानदानाचे काम करीत आहेत. शासनाच्या निकषाप्रमाणे कुटूंब कल्याण केस, शोलय प्रगती, शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल वाढविण्यामध्ये रजनी गायकवाड यांचा मोलाचा वाटा असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेत रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा समजला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना जाहिर करण्यात आला आहे. शिवनगर येथे शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल 100 टक्केपर्यंत नेण्याची विशेष कामगिरी त्यांनी केली आहे. रजनी गायकवाड यांना या अगोदर खालापूर तालुका पत्रकार संघाकडून गौरविण्यात आले आहे. तसेच ठाणे शिक्षक प्रतिष्ठान यांसह अनेक सामाजिक संस्थांनी वेळोवेळी त्यांच्या कामाची दखल घेत गौरविले आहे. त्यांना आदर्श पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.