तळोजा परिसरातून महिला बेपत्ता
पनवेल,(प्रतिनिधी) -- तळोजा परिसरातील मच्छी कंपनीतून आपल्या राहत्या घरी पेण जाण्यासाठी निघाली असलेली एक महिला अद्याप घरी न परतल्याने ती हरविल्याची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
सौ.प्रभावती गजानन पाटील वय 45 वर्षे, रंग गोरा, उंची 5 फूट, भांगेवर केस पांढरे, बांधा मध्यम, गळ्यात काळे मंगळसूत्र, अंगात नेसून रंगीबेरंगी चौकड्यांची साडी आकाशी रंगाचा ब्लाउज, खांद्यावर काळ्या रंगाची हॅन्डबॅग असे या महिलेचे नाव व वर्णन आहे. हि महिला तळोजा येथील फॉर स्टार मच्छी कंपनी तळोजा येथून आपल्या राहत्या घरी पेण येथे परतलीच नसल्याने गजानन पाटील यांनी तळोजा पोलीस ठाणे गाठत हरविल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीस तक्रार दाखल करून त्या महिलेचा शोध सुरु केला आहे. या महिलेबाबत अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे 02227412333 पोलीस नाईक अर्जुन पवार यांच्याशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.