पुजारी हा मंदिराचा मालक नाही: तर देवच मालक आहे
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पनवेलमधील पुजाऱ्यांचे धाबे दणाणले
बेकायदेशीर देवस्थानची जमीन विक्री करणाऱ्या ढोंगी पुजाऱ्यांची चौकशी करण्याची राजू गुप्ते यांची मागणी
पनवेल : राज भंडारी
नुकत्याच मध्यप्रदेशातील एका मंदिराच्या जागेवर हुकूमत गाजविणाऱ्या पुजाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. मंदिर देवस्थानच्या नावावर असणाऱ्या जागेचा मालक हा दस्तुरखुद्द देवच असून या जागेबाबत पुजाऱ्यांना काहीही संबंध नसल्याचा आदेश सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील पुजाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पनवेलमध्ये काही प्रमाणात ढोंगी पुजाऱ्यांनी देवस्थानच्या जागा आपल्या मालकीच्या असल्याचे भासवून त्याची विक्री करण्याचा प्रकार केला असल्यामुळे असल्या ढोंगी पूजाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी येथील प्रसिद्ध उद्योजक राजू गुप्ते यांनी केली आहे.
पुजारी हा भाग आहे, तो व्यवस्थापन ही जबाबदारी पार पाडत असतो, त्यामुळे तो त्याचा मालक होऊ शकत नाही. आणि देशातील कोणत्याही व्यवस्थापन सांभाळणाऱ्या पुजाऱ्याने आपली मालकी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न अथवा त्याबद्दलची लबाडी केल्यास भा.दं.वि.संहिता कलमांन्वये कायदेशीर कारवाईस पात्र ठरू शकत असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. देशभरात आत्तापर्यंत देवस्थानचे भूखंड विक्री करून मोठ्या प्रमाणावर माया जमा करणाऱ्या ढोंगी पुजाऱ्यांची काही कमी नाही. असाच प्रकार पनवेलमधील अं.भूखंड क्र. १०० येथील जाखमाता देवस्थान अर्थात गावदेवी मंदिराच्या प्लॉट बाबत घडला आहे. याप्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा ढोंगी पुजाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे असल्यामुळे अशा पुजऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पनवेलमधील प्रसिद्ध उद्योजक राजू गुप्ते यांनी प्रसिद्धीमाध्यमांद्वारे केली आहे.
कोट
पनवेल शहरामधील देवस्थानाची जमीन बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या ढोंगी पूजीरी कुटुंबाची चौकशी करण्याची पनवेल मधील सर्व जागृत नागरीक नक्कीच मागणी करीत आहेत आणि मी एक जबाबदार पनवेलकर म्हणून मी या ढोंगी पूजाऱ्यांच्या कारनाम्याचा जाहीर निषेध करून शासनाकडे ढोंगी पुजाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करतो.
- राजु गुप्ते, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, पनवेल