इंफिनिटी फाउंडेशन पनवेल, महानगरपालिका, रायगड जिल्हा परिषद, आदई ग्रुप ग्रामपंचायत व नेहरू युवा केंद्र संघटन अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली संपन्न

इंफिनिटी फाउंडेशन पनवेल, महानगरपालिका, रायगड जिल्हा परिषद, आदई ग्रुप ग्रामपंचायत व नेहरू युवा केंद्र संघटन अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली संपन्न



पनवेल-इंफिनिटी फाउंडेशन पनवेल, महानगरपालिका, रायगड जिल्हा परिषद, आदई ग्रुप ग्रामपंचायत व नेहरू युवा केंद्र संघटन अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या सायकल रॅलीचे उद्दिष्ट आजादी का अमृतमहोत्सव व स्वच्छता ही सेवा स्वच्छ भारत अभियान हे होते. या सायकल रॅलीमध्ये पनवेल क्षेत्रातील पाच सायकलिंग क्लब म्हणजे पनवेल सायकलिंग क्लब, पुश न पेडल, पेडल सिटी, के के सी सी व रनथोन क्लबने सहभाग घेतला. या कार्यक्रमांमध्ये 100 सायकलने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर जी, विधाते सर सहाय्यक आयुक्त पनवेल महानगरपालिका, मोहिते मॅडम सहाय्यक गटविकास अधिकारी पनवेल पंचायत समिती, शैलेश गायकवाड  मुख्य आरोग्य निरीक्षक पनवेल महानगरपालिका, अध्यक्ष इंफिनिटी फाउंडेशन श्री आयुफ अकुला, उपाध्यक्ष मुगदा म्हात्रे, सरचिटणीस पवित्र शेरावत व आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवात पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयापासून झाली व समाप्ती जिल्हा परिषद शाळा अदई या ठिकाणी सहभागी क्लबला सन्मानचिन्ह देऊन व सर्व सायकलिस्ट ला मॅडम व ट्रॉफी देऊन झाली