उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांची सिडको भवनला भेट, नागरी प्रश्नांबाबत साधला संवाद
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांनी 16 सप्टेंबर 2021 रोजी सिडको महामंडळाचे मुख्यालय असलेल्या, नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनला भेट देऊन नवी मुंबईतील विविध नागरी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली.
“मी सिडकोच्या संदर्भातील सर्व मुद्दे व बाबी त्याचप्रमाणे नवी मुंबईतील कायदा व सुव्यवस्थे संदर्भात विस्तृत माहिती घेतली. याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.”
मा. ना. श्री. अजित पवार,
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
या प्रसंगी मा. उपमुख्यमंत्र्यांसह मा. ना. श्री. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. ना. श्री. सुनिल तटकरे, लोकसभा सदस्य, मा. श्री. शशिकांत शिंदे, विधानसभा सदस्य, डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, मा. श्री. विलास पाटील, विभागीय आयुक्त, कोकण, मा. श्री. बिपिनकुमार सिंग, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, मा. श्री. अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, मा. श्री. एस. एस. पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, मा. श्री. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, मा. श्री. अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका, मा. श्री. गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका, मा. श्री. राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे, मा. डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड, मा. श्री. शशिकांत महावरकर, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, लोकप्रतिनिधी आणि सिडकोचे अन्य अधिकारी उपस्थित होते.