लाईव्ह महाराष्ट्र 9 न्युज पोर्टलचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

लाईव्ह महाराष्ट्र 9 न्युज पोर्टलचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ 



पनवेल (प्रतिनिधी) 
काळाचे बदलते पावले ओळखून युवा पत्रकार रवींद्र गायकवाड यांनी "लाईव्ह महाराष्ट्र 9" या न्यूज पोर्टलची नव्याने सुरुवात केली आहे. या पोर्टलचे शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आज (दि. ३०) करण्यात आला. या पोर्टलच्या माध्यमातून पनवेल, रायगड, नवी मुंबईसह राज्यातील विविध घडामोडी वृत्तांकनाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. 
      लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या पोर्टलच्या उद्घाटन कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तसेच ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे, दीपक महाडिक, पत्रकार केवल महाडिक, मयूर तांबडे, विशाल सावंत, सनीप कलोते, ओमकार महाडिक, दिपाली पारस्कर आदी पत्रकार उपस्थित होते. 
      माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस प्रगती होत चालली आहे. इंटरनेटच्या जगात आता लाईव्ह आणि ऑनलाईनला प्रणालीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.  एका क्लिकवर आपल्याला संपूर्ण जग दिसू लागले आहे. त्याप्रमाणे पत्रकारीता सुद्धा त्याचे वेध घेऊन काम करीत आहे. त्याच अनुषंगाने कोरोना महामारीमध्ये डिजिटल पत्रकारिता
सुद्धा नागरिकांनी  स्विकारली आहे. आणि त्याचा सामाजिक जीवनात यशस्वी प्रभाव दिसत आहे. 

कोट- आधुनिकरणाच्या युगात झपाटयाने सर्व क्षेत्रात बदल दिसून येत आहे, त्याच अनुषंगाने पत्रकारिता क्षेत्रातही अद्ययावत प्रणालीचा वापर वाढला आहे. समाजातील सर्व घटकात पत्रकारितेचा आदर राखला जातो. त्यानुसार सामाजिक हित जपत सर्व क्षेत्रातील वृत्तांचा आढावा वाचकांसमोर मांडणार आहे. 
                   - रविंद्र गायकवाड, संपादक- लाईव्ह महाराष्ट्र 9