सन्माननिय आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्त्य साधून कोपरा गावातील जलकुंभाचा लोकार्पण सोहळा संपन्न
खारघर(प्रतिनिधी)- सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्त्य साधून कोपरा गावातील जलकुंभाचा लोकार्पण सोहळा काल गुरूवार दिनांक ५ आॕगष्ट रोजी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सौ.कविता चौतमोल आणि सभागृह नेते मा.परेश ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाला.या जलकुंभाच्या उभारणीसाठी स्थानिक नगरसेवक ऍड. नरेश गणपत ठाकूर यांनी सन्माननिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको आणि पनवेल महानगरपालिकेकडे सतत पाठपुरावा केला होता.त्यांच्या या प्रयत्नाला यश मीळून या जलकुंभाची निर्मिती झाली.या जलकुंभाचा लाभ सेक्टर-१०,कोपरा गांव व परिसरातील रहिवाश्यांना होणार आहे.या नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी नगरसेवक अॕड.नरेश ठाकूर यांनी पुर्ण केल्याने जनतेमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या लोकार्पण सोहळ्यासाठी मा.सभापती नगरसेवक अभिमन्यूशेठ पाटील,नगरसेवक हरेष केणी,नगरसेवक प्रविण पाटील,नगरसेवक निलेश बावीस्कर,नगरसेविका सौ.संजना समीर कदम,नगरसेविका सौ.हर्षदा उपाध्याय,नगरसेविका सौ.आनिता पाटील भाजपा रायड जिल्हा युवा मोर्चाचे मा.सरचिटणीस समीर कदम त्याचबरोबर भाजपा खारघर-तळोजा मंडलचे अनेक महिला व पुरूष पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच सेक्टर-१० आणि कोपरा गांवातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.