१४९ वी भारतीय मजदूर संघाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोध्य येथे संपन्न

१४९ वी भारतीय मजदूर संघाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोध्य येथे संपन्न


      भारतीय मजदूर संघाची राष्ट्रीय कार्यकारिणीची १४९ वी बैठक आयोध्या येथील हनुमान बाग येथे १३,१४,१५ ऑगस्ट रोजी पार पडली. या बैठकीस राष्ट्रीय संघटन मंत्री बी.सुरेंद्रन,राष्ट्रीय अध्यक्ष हिरणमय पंड्या, राष्ट्रीय सरचिटणीस विनयकुमार सिन्हा, निलिमा चिमूरे,राष्ट्रीय प्रभारी आणा धुमाळ, पोर्ट महासंघाचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील,B.M.S. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोहन येनुरे,रेल्वे महासंघाचे सरचिटणीस मंगेश देशपांडे, केंद्रीय नेते जयंत देशपांडे, महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री राजेश,या राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये सर्व राज्यांचे B.M.S. चे सरचिटणीस, महासंघाचे सरचिटणीस, राष्ट्रीय पदाधिकारी,राष्ट्रीय सचिव,  सर्व राज्यांचे कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कायद्याप्रमाणे निश्चित करण्यात याव्यात. जीवनावश्यक खाद्यपदार्थ यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील कामगारांचे पगार महागाई प्रमाणे वाढविणे आवश्यक आहे, पेट्रोलच्या किमती प्रतीदीन वाढत आहेत त्यामुळे पेट्रोलियम पदार्थ G.S.T. अंतर्गत आणणे आवश्यक आहे. कामगारांवर होणारे अन्याय व नवीन जाचक कायदे व वाढती महागाई इत्यादी विरोधात अनेक ठराव करण्यात आले.भारतीय मजदूर संघाच्यावतीने संपूर्ण देशव्यापी ८ सप्टेंबर रोजी सर्व जिल्ह्याधिकारी कार्यालयावर धरणे जनअंदोलन करण्याचे ठरविण्यात आले.