स्थानिक प्रकल्पग्रस्तांना संधी द्या नाहीतर आंदोलन ... - आमदार प्रशांत ठाकूर यांचे सिडकोला पत्र
पनवेल (प्रतिनिधी) सिडकोने बेलापूर-पेंधर मार्गावरील नवी मुंबई मेट्रो प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे २५ ऑगस्ट रोजी भाजपच्या वतीने तळोजा येथील मेट्रोकार शेड येथे काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला दिला आहे तसेच त्यासंदर्भातील पत्र सिडकोच्या व्यस्थापकीय संचालकांना दिले आहे.