स्वखर्चाने नवीन पाईप लाईनचे काम
पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग 'ड' सभापती सुशिला जगदीश घरत व सामाजिक कार्यकर्ता जगदिश घरत यांनी नवीन पनवेलमधील पीएल ५|५२ बिल्डिंगमध्ये स्वखर्चाने नवीन पाईप लाईनचे काम करून दिले. त्यामुळे तिसऱ्या मजल्यावर पाणी पोहचून रहिवाशांच्या चेहर्यावर आनंद निर्माण झाला.
काही दिवसांपासून पीएल ५|५२ सेक्टर १७ बिडींग मध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली होती. सदरची बाब रहिवाशांनी सभापती सुशिला घरत व समाजसेवक जगदीश घरत यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, त्यानुसार दुसर्याच दिवशी स्वखर्चाने कामाला सुरुवात करून काम पूर्णत्वास आले. त्यामुळे रहिवाशांना फार मोठा दिलासा मिळाला. त्याबाबद्दल रहिवाशांनी सभापती सुशीला घरत व जगदीश घरत यांचे आभार मानले.
यावेळी प्रभाग १७ अध्यक्ष विजय म्हात्रे, युवा नेते सचिन पाटील, इंद्रायणी असोशियनच्या अध्यक्ष सुभद्रा भोळी, संदीप ना.पाटील, शरद म्हात्रे, अनंत ठाकूर, विशाल जावळे, अनंत जाधव,व महिला वर्ग उपस्थित होता.