आ.प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला पनवेलच्या व्यापार्‍यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

आ.प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला पनवेलच्या व्यापार्‍यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद


पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पुरग्रस्तांना सढळ हाताने मदत करा या आ.प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला पनवेलमधील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून त्यातील एक प्रतिष्ठीत व्यापारी चंद्रकांत रिखबदास चोरडीया यांनी त्यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात पुरग्रस्तांसाठी नवीन कोरे असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस व गाऊन मदत म्हणून दिली आहे.

शहरातील व्यापारी चंद्रकांत चोरडीया यांचा व्यापार कमी प्रमाणात आहे. तसेच गेल्या 2 वर्षापासून झालेल्या लॉकडाऊनचा फटका त्यांना सुद्धा बसला आहे. व्यवसाय अर्ध्यावर आला आहे. परंतु कोकणातील बांधवांवर कोसळलेले संकट हे आपल्यावर कोसळलेले संकट आहे व त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी खिशाला चाट देवून नवीन कोरे वेगवेगळ्या प्रकारचे 100 ड्रेस व माता भगिनींसाठी 50 गाऊन आणून ती मदत पुरग्रस्तांसाठी केली आहे. यावेळी प्रभाग 19 चे नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेविका रुतुजा लोंढे आदींच्या उपस्थितीत ही भरघोस मदत त्यांनी केली आहे. या मदतीचे आ.प्रशांत ठाकूर यांनी मनापासून कौतुक करून अशीच गोरगरीबांसाठी मदत सर्वांनी करावी, असे आवाहन सुद्धा केले आहे.

Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image