ध्वजनिधी ऑनलाईन जमा करण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन

 *ध्वजनिधी ऑनलाईन जमा करण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन*

*दिप प्रज्वलन करुन ध्वजनिधी संकलन शुभारंभ*




ठाणे दि. 7 जिमाका: ध्वजनिधी ऑनलाईन जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.तरी या सुविधाचा जास्तीत जास्त वापर करवा असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ व विजय दिवस कार्यक्रमात केले.या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी दिप प्रज्वलन करुन करण्यात आले.


 यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब डांगडे, पोलीस अधिक्षक ( ग्रामीण) स्मिता पाटील अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे,निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन अभिजीत भांडे उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन अभिजीत भांडे पाटील, ,शिक्षण अधिकारी (माध्यमिक) शेषराव बडे,,जिल्हा सैनिक अधिकारी मेजर प्रांजल जाधव उपस्थित होते.


   या कार्यक्रमात महाराष्ट्र माजी सैनिक कल्याणकारी संस्था,ठाणे.माजी सैनिक कल्याणकारी संघटना,कल्याण,माजी सैनिक संघटना,बेलापूर,आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्था,डोंबिवली,युनायटेड एक्स सर्व्हिसमेन असोशिएशन,अंबरनाथ व ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिक सहभागी होते.


माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतात 7 डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो व त्या निमित्ताने 7 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेर पर्यंत निधी गोळा केला जातो.भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले,अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडी-अडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो.


या वेळी माजी सैनिक मंगेश धिमते यांची कन्या नुपुर धिमते यांना राजस्तरीय कराटे स्पर्धमध्ये दुसरा क्रमांक आल्यामुळे व माजी सैनिक दिलीप पोखरकर यांची कन्या इयत्ता 12 वी मध्ये 90.92 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते विशेष गौरव पुरस्कार दहा हजाराचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.


या वेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर म्हणाले की, ध्वजनिधीसाठी सर्व अधिकारी यांनी आपल्याला दिलेल ध्वज निधीचे उचित ध्येय पुर्ण पाहिजे.लोक ध्वजनिधीसाठी मदत करतात आपण त्याच्या पर्यंत पोचले पाहिजे. ज्याच्या पर्यंत पोचणे शक्य नाही त्यांना ऑनलाईन ध्वजनिधीसाठी करण्यासठी मार्गदर्शन करावे. माजी सैनिक व त्याचे पाल्य शासकीय कार्यालयात कामानिमित्त येतात तेव्हा त्यांना सहकार्य केले पाहिजे.शाळा ,कॉलेजच्या विद्यार्थांमध्ये देश भावना जागृत करुन जास्तीत जास्त तरुणांनी देश सेवा करण्यात प्रोत्साहीत केले पाहिजे.ध्वज निधीचे उचित ध्येय लवकरच पुर्ण करु या. 


जिल्हा सैनिक अधिकारी ठाणे यांचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून मिळणाऱ्या माजी सैनिक पाल्यांच्या प्रवेशासाठी माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र मालमत्ता कर सवलत प्रमाणपत्र तसेच ध्वजनिधी देणगी इत्यादी सुविधा ऑनलाईन केल्यामुळे त्यांचे अभिनंद केले.