दिव्यांग क्रांती संघटनेचा भाजप महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा

 दिव्यांग क्रांती संघटनेचा भाजप महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा 



पनवेल (प्रतिनिधी) दिव्यांगांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या दिव्यांग क्रांती संघटनेने पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र संघटनेकडून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे  सुपूर्द करण्यात आले.  
          पनवेल महानगरपालिका निवडणूकीकरीता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस, आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या उमेदवारांना दिव्यांग क्रांती संघटना जाहीर पाठिंबा देत असून संघटनेचे सभासद हितचिंतक व सर्व पदाधिकारी या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्य करतील, असा विश्वास दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील, महाराष्ट्र सचिव राजाराम गोरे, पनवेल व उरण तालुकाध्यक्ष संदीप काशिद यांनी दिलेल्या पाठिंबा पत्रात दिला आहे.