कामोठे परिसरात भाजप महायुती भक्कम; प्रभाग १३ मध्ये चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील – लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) कामोठे परिसरात भाजप महायुतीची ताकद भक्कम असून येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची हवा आधीच गुल झाली आहे, विकासाचा दृष्टीकोन घेऊन अनेक विकासाची कामे भाजपच्यावतीने झाली आहेत, त्यामुळे प्रभाग क्रमांक १३ मधील महायुतीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. असा विश्वास महानगरपालिका निवडणूक प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामोठे परिसरात भाजप महायुतीच्या उमेदवारांचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. भाजप महायुतीच्या नेतृत्वाखाली झालेल्या चौफेर विकासकामांमुळे महायुतीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विकासाच्या मुद्द्यावर भाजपने केलेल्या कामांची दखल मतदार घेत असून त्याचा थेट फायदा महायुतीच्या उमेदवारांना होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथील मानसरोवर कॉम्प्लेक्स परिसरात प्रभाग क्रमांक १३ मधील उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार केला. यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) या महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रभाग क्रमांक १३ मधील महायुतीचे उमेदवार रवींद्र गणपत जोशी, विकास नारायण घरत, हेमलता रवी गोवारी आणि शिला भाऊ भगत यांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला व महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. या प्रचारावेळी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, के. के. म्हात्रे, राजेश म्हात्रे, श्रावण घरत, रवी गोवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

