काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी रामनाथ पंडित यांची नियुक्ती

 काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी रामनाथ पंडित यांची नियुक्ती




उरण  दि १४(विठ्ठल ममताबादे )शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे उरण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते रामनाथ पंडित यांची रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी नुकतेच नियुक्तीचे पत्र देऊन रामनाथ पंडित यांचे अभिनंदन केले.

रामनाथ पंडित हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांची राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. बॅ. ए. आर. अंतुले यांच्यावर अपार श्रद्धा आहे. त्यांनी बॅ. ए. आर. अंतुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गोरगरीबांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तसेच अनेक आंदोलनात सहभाग घेतला. वृध्दांना मायेचा हात देऊन, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी घेऊन, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामनाथ पंडित यांची रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे लेखी पत्र देऊन त्यांचा सन्मान केला आहे. यावेळी उपस्थित काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रामनाथ पंडित यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल सन्मानपदक’ जाहीर
Image