निलेश सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर

निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  


पनवेल प्रतिनिधी
निलेश सोनावणे सर्वाना सोबत घेऊन ,सर्वाना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता असल्याचे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले ,पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची कार्यकारिणी निवडणूक नुकतीच पार पडली त्या निवडणुकीत  निलेश सोनावणे यांची पुन्हा एकदा आठव्यांदा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर सचिव पदी संतोष आमले, कार्याध्यक्षपदी अण्णा आहेर , खजिनदार पदी राजेंद्र कांबळे तर उपाध्यक्ष पदी तुळशीराम बोरीले यांची सर्वानुमते निवड झाल्याने लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले त्या वेळी ते बोलत बोलत होते .  
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवीन कार्यकारिणीला आपल्या शुभेच्छा देताना निलेश सोनावणे  समाजात चांगले काम करीत असून सर्वांना सोबत घेऊन जाणारा सुशिक्षित  कार्यकर्ता आहे, सर्वांना न्याय देणारा कार्यकर्ता आहे ,माझे आशीर्वाद आणि सहकार्य पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीला कायम असेल असे प्रतिपादन  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले .
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती गेली पंधरा वर्षे पनवेल तालुक्यात कार्यरत असून ती जिवंत ठेवण्याचे काम  करणारे निलेश सोनावणे यांची  आठव्यांदा अध्यक्षपदी निवड केली असल्याचे कार्याध्यक्ष अण्णा आहेर यांनी आपल्या प्रास्ताविकात केले .यावेळी अण्णा आहेर यांनी समितीच्या उपक्रमाची देखील माहिती सांगितली ,यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश सोनावणे ,सचिव संतोष आमले ,कार्याध्यक्ष अण्णा आहेर , खजिनदार राजेंद्र कांबळे  उपस्थित होते  

Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल सन्मानपदक’ जाहीर
Image